PCMC : तळेगावचे सीओ एन.के.पाटील पिंपरी महापालिकेत तर विजयकुमार सरनाईक पुन्हा तळेगावमध्ये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भूमी आणि (PCMC) जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची पुन्हा तळेगावदाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (सीओ) पदी बदली झाली आहे. तर, मुख्याधिकारी एन.के.पाटील यांची पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाने काढले.

तळेगावदाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी असलेले सरनाईक यांची 21 एप्रिलरोजी मुदतपूर्व बदली झाली होती. सोलापूरला सहआयुक्त (जिल्हा प्रशासन) पाटील यांच्या जागी सरनाईक यांची बदली झाली होती. तर पाटील यांची बदली तळेगाव येथे सीओ म्हणून नगरविकास विभागाने केली होती. पण, सरनाईक सोलापूरला रुजू झाले नाहीत. त्यानंतर त्यांची पिंपरी महापालिकेत बदली झाली.

एन.के.पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून मुलभूत नागरी सुविधांही मिळत नसल्याने तळेगाव शहरातील हैराण झाले होते. तसेच नगरपरिषदेच्या कारभारातही विस्कळीतपणा आल्याने आमदार सुनील शेळके यांच्यासह नागरिकांनी पाटील यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. समस्यांसाठी नागरिकांनी उपोषणही केले होते. अखेरीस शुक्रवारी पाटील यांची पिंपरी महापालिकेत बदली झाली. तर, त्यांची जागी पुन्हा सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

NCP : राजीनामा ते राष्ट्रवादी फूट काकांची स्क्रीप्ट? अजित पवार यांचे गौप्यस्फोट खरे की राष्ट्रवादीची नवी खेळी?

दरम्यान, महापालिकेतील आकाश चिन्ह व परवाना विभागाचे (PCMC) उपायुक्त सुभाष इंगळे यांची मुंबईत मंत्रालयात ग्रामविकास विभागाच्या उपसचिवपदी बढतीने बदली झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.