NCP : राजीनामा ते राष्ट्रवादी फूट काकांची स्क्रीप्ट? अजित पवार यांचे गौप्यस्फोट खरे की राष्ट्रवादीची नवी खेळी?

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीमध्ये नेमका काय गोलमाल सुरू आहे? (NCP) या चर्चेला अजित दादांच्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा उधाण आले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांचा राजीनामा प्रसंग ठरवून केलेला होता शिवाय नंतर झालेली आंदोलने, रडारड आणि राष्ट्रवादी फूट हे देखील स्क्रीप्टेड असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा दादा-काका जोडीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी राजीनामा ठरवून दिला होता, त्यानंतर झालेली आंदोलन ठरवून झाली होती, पुण्यात चोरडियांच्या घरी झालेली भेटही ठरवूनच झालेली होती. हे सर्व शरद पवार यांच्या प्लॅनिंगने झाल्याचे अजित पवार यांना दर्शवायचे होते.

2 मे रोजी पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्वच नेते रडू लागले..शिवाय आंदोलने देखील झाली. परंतु, ही सर्व शरद पवारांची खेळी होती..असे अजित पवार यांचे म्हणणे असून राष्ट्रवादी मधील फूट दादांचा राजीनामा हा काकांच्या म्हणण्यानुसार झाला असेही त्यांनी सूचित केले.

T20 Cricket : चौथ्या टी-20 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; सर्वाधिक T20 जिंकण्याचा विश्वविक्रम

परंतु, निवडणुकीच्या प्रचारासाठी दादा-काका मात्र मैदानात विरोधात (NCP) उभे राहिल्याने अजित पवार यांचे गौप्यस्फोट नेमके खरे की खोटे हा विचार करण्याचा भाग आहे. दादा-काका यांचे राजकारण मात्र महाराष्ट्राला न उमगलेले कोडेच आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.