T20 Cricket : चौथ्या टी-20 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; सर्वाधिक T20 जिंकण्याचा विश्वविक्रम

एमपीसी न्यूज : रिंकू सिंगच्या 29 चेंडूत 46 धावा आणि जितेश (T20 Cricket) शर्माच्या 19 चेंडूत 35 धावांच्या खेळीनंतर भारताने चौथ्या टी-20 सामन्यात तगड्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला. यासह यजमान टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 175 धावांच्या लक्ष्यासमोर ऑस्ट्रेलियन संघ केवळ 154 धावाच करू शकला.

आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी बेंगळुरू येथे होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना एके काळी भारताची धावसंख्या 18.3 षटकांत चार विकेट गमावून 167 धावा होती, पण त्यानंतर अखेरच्या दोन षटकांत अवघ्या सात धावांत संघाने पाच विकेट गमावल्या.

भारताला मालिका जिंकून देण्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अक्षर पटेलने अवघ्या 16 धावा देत सर्वाधिक तीन बळी घेतले.

Today’s Horoscope 02 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सर्वाधिक T20 जिंकण्याचा विश्वविक्रम – T20 Cricket

घरच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचा हा सलग 14वा टी-२० मालिका विजय आहे. इतकेच नाही तर मेन इन ब्लूने सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे. हा भारताचा 136 वा T20 विजय होता, ज्यामध्ये पाकिस्तानलाही (135 विजय) भारताने मागे टाकले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.