Cricket News : रवी बिष्णोई आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर वन

एमपीसी न्यूज : रवी बिष्णोई ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Cricket News) टी-20 मालिकेतील चमकदार कामगिरीनंतर पुरुषांच्या टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. जिथे त्याने 5 सामन्यांत 9 विकेट्स घेऊन प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला होता.

23 वर्षीय रवी बिष्णोईने अफगाणिस्थानचा लेग स्पिनर रशीद खानला मागे टाकत टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. बिष्णोईच्या नावावर एकूण 699 रेटिंग गुण आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये ईडन गार्डन्सवर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले.

Pune : सुषमा अंधारे यांनी घेतली तळवडे दुर्घटनेतील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट

तेव्हापासून बिष्णोई टीम इंडियासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. स्पिनर आणि गुगली त्याच्या चपळ (Cricket News) शैलीने फलंदाजांना त्रास देत आहे. त्याने 21 टी-20 सामन्यांत 17.38 च्या अॅवरेजने 34 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट 7.14 इतका राहिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.