Pune : सुषमा अंधारे यांनी घेतली तळवडे दुर्घटनेतील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात गंभीर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या (Pune) नातेवाईकांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.

Wakad : खूनाच्या आरोपीला वाकड पोलिसांनी केलीचार तासात अटक, फिरस्ती व लहान मुलामुळे लागला आरोपीचा सुगावा

यावेळी त्यांनी ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्याशी बोलून अत्यावस्थ रुग्णांची माहिती घेतली. या स्फोटात तब्बल 16 लोक जखमी झाले होते. यातील YCM रुग्णालयात दाखल केलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरित दहा  ससून हॉस्पिटलला हलवण्यात आले होते त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू आज झाला.

उर्वरित आठ जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याप्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे उपशहर प्रमुख आनंद गोयल शहर, शिव आरोग्य सेना आणि पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.