Today’s Horoscope 02 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Horoscope 02 December 2023
आजचा दिवस – शनिवार.
तारीख – 02.12.2023
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – पुष्य 18.54 पर्यंत नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
—————————–
मेष – ( शुभ रंग – चंदेरी)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुले मन लावून अभ्यास करतील. गृहिणींचे सासरी वर्चस्व राहील.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागेल. रिकामटेकडी चर्चा फक्त वादस कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. शब्दांचा वापर जरा जपूनच करा.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पडतील. उत्साही दिवस.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात फायदेशीर असे नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आपले आवडते छंद जोपासू शकाल. इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल.

सिंह -( शुभ रंग – आकाशी) -Horoscope 02 December 2023
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा असेल.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची आज तुमची तयारी असेल.

वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही अकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

धनु (शुभ रंग- भगवा)
फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी हळू चालवलेली बरी.

मकर (शुभ रंग- पिस्ता)
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतत सतर्क रहा.

कुंभ – (शुभ रंग- तांबडा)
कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्या. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. आज हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

मीन ( शुभ रंग- मरून)
आज हौस मौज करण्याकडे तुमचा कल राहील उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

Pune : ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले -डॉ. सच्चिदानंद जोशी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.