PCMC: विशाखा समिती अध्यक्षपदी उज्वला गोडसे,  ढाकणे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

एमपीसी न्यूज – अखेर दीड महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिका प्रशासनाने विशाखा समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे यांच्याकडे महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मंगळवारी  दिली. त्याबाबतचा आदेश सायंकाळी काढण्यात आला.  तर, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेमधील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे. कार्यालयात कामकाज योग्य वातावरण असावे. त्यांना कोणी त्रास दिल्यास तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी सदस्या आहेत. तर, वर्ग एकच्या महिला अधिकारी समितीच्या अध्यक्षा असतात.

पुणे : पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद

या समितीवर सहआयुक्त आशादेवी दुरगुडे या अध्यक्षा होत्या. त्या 31 मार्चला निवृत्त झाल्या. तेव्हापासून समितीचे अध्यक्षपद रिक्त होते. अखेरीस प्रशासनाने आज माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे यांच्याकडे महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

उमेश ढाकणे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

मुख्याधिकारी संवर्गातील उमेश ढाकणे हे 28 एप्रिल रोजी महापालिकेत रुजू झाले आहे. त्यांच्याकडे 17 दिवस कोणत्याही विभागाची जबाबदारी दिली नव्हती. मंगळवारी प्रशासनाने सहाय्यक आयुक्त ढाकणे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सोपविले आहे. त्यांच्या आस्थापना विषयक बाबी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडे राहणार (PCMC) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.