Pimple Gurav: टोळक्‍याने तरुणावर ‘रिव्हॉल्वर’ रोखली

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणातून टोळक्‍याने एका तरुणावर चाकूने वार करत त्याच्यावर ‘रिव्हॉल्वर’ रोखली. ही घटना पिंपळे सौदागर येथे गुरुवारी (दि.14) रात्री अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अतुल उर्फ चांड्या पवार, सनी परदेशी, राहूल उर्फ दगड्या टोपणे (तिघेही रा. डिलक्स चौक, मिलींदनगर, पिंपरी)यांच्यासह त्यांच्या इतर तीन ते चार साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हैदर जावेद सय्यद (वय- 26 रा.पिंपळे गुरुव) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हैदर हा गुरुवारी मित्रांसोबत पिंपळे गुरव येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग काढत हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हैदर याला ‘रिव्हॉल्वर’चा धाक दाखविला. चाकूने त्याच्या उजव्या मांडीवर वार केले. मारहाण होत असताना हैदर पळून जात असता आरोपींनी त्याचा पाठलाग ही केला. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.