Wakad: टीव्ही, सोफासेटसाठी विवाहितेचा छळ; पती, सासू -सासरे, आजी सासुच्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेरून टीव्ही आणि सोफासेटसाठी पैसे घेऊन येण्याचा तगादा लावत आणि चारित्र्याच्या संशय घेत सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. हा प्रकार 9 मे 2018 ते 14 मार्च 2019 दरम्यान बीड आणि थेरगाव येथे घडला. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती तुळशीराम अरुण भांगे (वय 27), सासरे अरूण रावसाहेब भांगे (वय-55), सासू पद्मीनी अरुण भांगे (वय 45)आणि आजे सासू (नाव समजू शकले नाही, सर्व रा. बेलगाव, ता. केज. जिल्हा बीड)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 24 वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेराहून पैसे, टिव्ही आणि सोफासेट घेऊन ये म्हणत पती आणि इतर सासरच्या मंडळींनी फिर्यादीचा शारीरीक व मानसीक छळ केला. तसेच पती तुळशीराम याने चारित्र्याचा संशय घेत शारिरीक संबंध ठेवण्यावरून त्रास दिला. हाताने मारहाण केली. टीव्ही आणि सोफासेटसाठ आणले नाहीतर नांदविणार नसल्याची धमकी दिली. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.