Pimple Gurav : श्री गणेश सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पिंगळेगुरव येथील श्री गणेश सहकारी बँक मर्यादित या बँकेची (Pimple Gurav) पंचवार्षिक सन 2023-2028 निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 17 जागांसाठी 17 अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी  नागनाथ केंजेरी यांनी जाहीर केले.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करता येऊ शकतो, हे समजून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरव येथे सन 1998 साली बँकेची स्थापना केली. बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे.

श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे बँकेचे संस्थापक – संचालक होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने या बँकेच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत.

आपल्या ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशा भावना श्री गणेश सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक शंकर जगताप यांनी केले.या निवडलेल्या संचालक मंडळातून बँकेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडले जाणार आहेत.

नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे

संचालक सदस्य – सर्वसाधारण गट : शंकर जगताप, संजय  जगताप, दत्तात्रय  चौघुले, शशिकांत  कदम, उद्धव  पटेल, अंकुश  जवळकर, संतोष  देवकर, शिवलिंग  किंणगे, मधुकर  रणपिसे, सुरेश  शिंदे, शहाजी  पाटील, प्रमोद  ठाकर, महिला गट – राजश्री  जाधव, शैला  जगताप, राखीव गट (अ. जा. अ. ज) – अभय  नरडवेकर,  राखीव गट  (इ. मा. व.) – राजेंद्र  राजापुरे, राखीव गट (भ. जा., वि. जा. वि. मा. प्र) – सुरेश  तावरे.

बँकेला बिनविरोध निवडणुकीची परंपरा

बँकेची मागील निवडणूक सन 2015 ते 2020 या कालावधीसाठी घेण्यात आली होती. या कालावधीमध्ये बँकेचे अध्यक्ष संजय जगताप होते. सन 2020 साली असलेल्या कोरोना काळामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सन 1998 या साली बँकेची स्थापना झाली आहे. लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेताना बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रथेला सुरुवात केली होती. आज मात्र, आमदार जगताप हयात नसताना त्यांचे बंधू शंकर जगताप यांनीदेखील हीच परंपरा कायम राखताना ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली.

श्री गणेश सहकारी बँक नियमित प्रगती करत आहे. यामुळे बँकेवर तिच्या ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर व बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित संचालक कटिबद्ध आहोत, असे बँकेचे नवनिर्वाचित संचालक शंकर जगताप यांनी (Pimple Gurav) म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.