Rahatani : दिवाळी सुट्टीपूर्वी बालचमूने साजरी केली आनंदाची दिवाळी

एमपीसी न्यूज – आकाश कंदीलांची (Rahatani) सजावट, रांगोळी, पणत्या, किल्ला आणि त्यावरील मावळे, सोबतीला गोड गोड खाऊ अन् दिवाळी सणांची गाणी अशा सुंदर वातावरणात बालचमुने दिवाळी सुट्टीपूर्वी आनंदाची दिवाळी साजरी केली.

पीसीएमसी पब्लिक स्कूल रहाटणीच्या बालवर्गातील मुलींनी खेळाबरोबर गाण्यांचाही आनंद घेतला. समाज सहभागांतर्गत इनरव्हील क्लबच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Pune : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

क्लबच्या अध्यक्षा अंजली दाशरती यांच्या हस्ते मुलींना गोष्टीची पुस्तके देण्यात आली. यावेळी सुनीता काकडे, कविता गोडांबे, (Rahatani) मीना शिवरामवार, अंजली सप्रे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांनी मार्गदर्शन केले. बालविभाग प्रमुख पौर्णिमा पाचबोले व संगीता राजगुरू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शोभा घावटे यांनी स्वागत केले. वैशाली कुरुपखिळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.