Pune : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी (Pune) ललित पाटील आणि त्याच्या इतर 2  साथीदारांना 13 तारखेपर्यंत  मोक्का अंतर्गत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Chinchwad : विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघाने घेतली खासदार बारणे यांची भेट

ललित पाटील याच्यासह शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी या दोघांना सुद्धा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणात शिवाजी शिंदे हा गुजरात आणि मुंबई मधून केमिकल आणत होता. ड्रग्स प्रकरणी आणखी 8 आरोपींची पोलीस कोठडी घ्यायची असल्याने पुणे पोलीस कोर्टाला प्रोडक्शन वॉरंट देणार आहे.

ललित पाटील कडून आत्तापर्यंत 8 किलो सोने जप्त  करण्यात  आले आहे. ललित पाटील आणि इतर 13 आरोपींची संयुक्त चौकशी करायची असल्याची पोलिसांनी  कोर्टात विनंती केली होती. त्यानुसार आज ललित पाटीलला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ( Pune)  सुनावण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.