Pimpri : अवघ्या सव्वा दोन तासात सुरतहून आणलेल्या फुफ्फुसांचे यशस्वी प्रत्यारोपण

कबुतरांच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसे झाली होती निकामी

एमपीसी न्यूज – कबुतरांच्या संपर्कात आल्याने 53 वर्षीय महिलेची ( Pimpri ) फुफ्फुसे निकामी झाली. या महिलेवर पिंपरी येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, सुरत येथून आणलेली फुफ्फुसे महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली. जिल्हा रुग्णालय सुरत ते सुरत विमानतळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉर, सुरत विमानतळ ते पुणे विमानतळ दरम्यान चार्टर विमानाने आणि पुणे विमानतळ ते डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी दरम्यान पुन्हा ग्रीन कॉरिडॉर करून अवघ्या सव्वादोन तासात आणलेली फुफ्फुसे महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली आहेत.

53 वर्षीय महिला रुग्णाला 20 सप्टेंबर रोजी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी ( Pimpri ) हॉस्पिटल, पिंपरी येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीला श्वासोच्छवासामध्ये अडथळा निर्माण झाल्याने व्हेंटिलेटरीची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांचे नाव दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयव प्राप्तीच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले होते. 28 सप्टेंबर रोजी रुग्णालयाला संबंधित यंत्रणेकडून योग्य अवयव दाता उपलब्ध असल्याची माहिती मिळाली.

सुरत जिल्हा रुग्णालयामध्ये 42 वर्षीय मेंदूमृत पुरुषाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि अवयवदानाच्या सहमतीने पुढील प्रक्रिया सुरु झाली. सूचना मिळाल्यावर, CVTS सर्जन, ट्रान्सप्लांट पल्मोनोलॉजिस्ट आणि इतर पॅरामेडिकल तज्ञ यांचा समावेश असलेले डॉक्टरांचे पथक ताबडतोब सुरतला रवाना झाले.

Pune : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सुरतच्या जिल्हा रुग्णालयामधून संध्याकाळी 4 वाजता अवयव काढण्यात आले आणि 2 तास 15 मिनिटांत संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटाने डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथे सुखरूप आणण्यात आले. तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नामुळे अवयव आणण्याची प्रक्रिया यशस्वी पार पडली.

अवयव योग्य कालावधीत काळजीपूर्वक तसेच योग्य वेळेवर नियोजनबद्ध, गतिशील प्रक्रियेने ( Pimpri ) व्हावे यासाठी हवाई मार्गाने अवयव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरत आणि पुणे वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले.

Chinchwad : विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघाने घेतली खासदार बारणे यांची भेट

29 सप्टेंबर रोजी हे अवयव पुण्यात वेळेत पोहोचवण्यात आले आणि त्याच दिवशी यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपणानंतर रुग्णाने अवयवाला चांगला प्रतिसाद दिला असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

कुलपती डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “अवयव प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे लोकांना नवीन जीवन मिळते आणि असंख्य रुग्णांसाठी हे प्रत्यक्षात आणताना आम्हाला अभिमान वाटतो.

आज बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि सक्षम कुशल डॉक्टरांच्या टीममुळे आम्ही आणखी रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सज्ज आहोत. आणि, हे प्रकरण त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे.”

हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभगाचे संचालक डॉ. संदीप अट्टावार म्हणाले, “एक मौल्यवान जीव वाचवू शकलो हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. सूचना मिळताच आम्ही त्वरीत शस्त्रक्रियेचे नियोजन केले आणि महत्वाचे म्हणजे अवयव वेळेत उपलब्ध झाले.

डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे आम्हाला अशा जटिल शस्त्रक्रिया सहजतेने पार ( Pimpri ) पाडण्यासाठी सक्षम करतात.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.