Chinchwad : विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी संघाने घेतली खासदार बारणे यांची भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाने (Chinchwad) रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. पुणे-मुंबई प्रवासादरम्यान प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, चालू असलेल्या रेल्वेंना थांबा देणे, नवीन गाड्या सुरु करणे याबाबत खासदार बारणे यांच्याशी चर्चा करण्यात आली. बारणे यांनी केंद्रीय पातळीवर याबाबत पाठपुरवा करणार असल्याचे सर्व प्रवाशांना आश्वासन दिले.

सध्या सुरु असलेली सिंहगड एक्सप्रेस(11009/11010) ही गाडी नियमित पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची आहे. त्यामुळे या गाडीच्या वेळेत कोणतेही बदल करण्यात येऊ नये. कोरोना पूर्वी सिंहगड एक्सप्रेस 19 डब्यांची होती. ती गाडी एलएचबी कोचमध्ये रुपांतरीत केल्यानंतर आता 15 डब्यांची चालवली जात आहे. प्रवाशांची या गाडीला पसंती असते. त्यामुळे प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेता सिंहगड एक्सप्रेस पूर्ववत 19 डब्ब्यांची चालवण्यात यावी.

5 नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस ही पुण्यापर्यत सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर नंतर ती मुंबई येथून सोडण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून संध्याकाळी 5.50 वाजता सिंहगड एक्सप्रेस (11009) नंतर पुणे येथे जाण्याकरिता दुसरी गाडी रात्री 8.30 वाजता आहे, तरी या मधल्या वेळेमध्ये पुणे येथे जाण्याकरिता गाडी नसल्यामुळे कृपया सह्याद्री एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटी येथून संध्याकाळी 6.30 ते 7.00 या वेळेत सोडण्यात यावी.

प्रगती एक्सप्रेस या गाडीस कनेक्टिंग लोकल नसल्यामुळे या गाडीस पुणे-मुंबई-पुणे दरम्यान चिंचवड स्टेशन येथे थांबा देण्यात (Chinchwad) यावा. पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान नव्याने लोकल सुरु करण्यात येणार असून, दुपारी 12.45 ते 1.00 च्या सुमारास लोणावळा-पुणे लोकल सुरु करावी. यामुळे ग्रामीण भागातून लोणावळा येथे शिक्षणाकरिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय कमी होईल. पुणे लोणावळा चौपदरीकरण करण्याची देखील यावेळी मागणी करण्यात आली.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून 20 दिवसात 7 हजार 700 अवजड वाहनांवर कारवाई

पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी सध्या चिंचवड, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण या मार्गे रद्द करून ही गाडी पुणे दौंड मार्गे अमरावती अशी नव्याने सुरू करण्यात आली आहे. ती गाडी पुन्हा चिंचवड, लोणावळा, कल्याण मार्गे सुरू करण्यात यावी. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना महिलांसाठी पास बोगी राखीव आहे. पण एकमेव सिंहगड एक्सप्रेसला ही सुविधा महिलांसाठी नाही. सिंहगड एक्सप्रेसला पासधारक महिलांसाठी एक राखीव बोगी देण्यात यावी

पुणे येथून रात्री 11.15 वाजता सुटणारी पुणे तळेगाव रद्द केलेली लोकल पुन्हा सुरू करण्यात यावी. शिवाजीनगर येथून सुटणाऱ्या सर्व लोकल पुणे रेल्वे स्थानकावरुन सोडण्यात याव्यात. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ, व्ही पी एस प्राथमिक साला, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा लोणावळा , गुरुकुल हायस्कूल, रयत शिक्षण स्वसंस्था ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.