Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून 20 दिवसात 7 हजार 700 अवजड वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभाग कारवाईसाठी (Chinchwad)  सक्रीय झाला आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठराविक वेळेत शहरात जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मागील 20 दिवसात वाहतूक पोलिसांनी 7 हजार 700 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली आहे.

16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 7 हजार 709 जड अवजड वाहनांवर कारवाई करत सुमारे पाउण कोटीचा दंड आकारण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे. हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क तर देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ पिंपरी येथे आहे.

Mumbai -Pune Express Way : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

त्यामुळे या भागात मालाची नेआण करणाऱ्या जड अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच अपघातांची देखील संख्या वाढत आहे.

यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत जड अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. अशी वाहने शहरात दिसताच त्यावर कारवाई केली जात आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत असेल तर नागरिकांनी तत्काळ वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून त्याची माहिती देण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले (Chinchwad)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.