Rahatni: गॅस चोरी प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज.- धोकादायकरीत्या भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या(Rahatni) सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) रात्री पावणे दहा वाजता नखाते नगर, रहाटणी येथे साईराम गॅस सर्विस या दुकानात करण्यात आली.
ज्ञानेश्वर नरसिंगराव बाबळसुरे (वय 41, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या (Rahatni)आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सौदागर लामतुरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Kasarwadi: पीएमटी बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. चोरून भरलेल्या सिलेंडरची चढ्या भावाने विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करत ज्ञानेश्वर याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.