Kasarwadi: पीएमटी बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

एमपीसी न्यूज – पीएमटी बसने प्रवास करत असताना प्रवासी (Kasarwadi)महिलेच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली दोघांनी पळवली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी, नाशिक फाटा येथे घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन(Kasarwadi) अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimple Saudagar: टास्कच्या बहाण्याने एक कोटी 10 लाखांची फसवणूक 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक फाटा, कासारवाडी येथून पीएमटी बसने प्रवास करत होते. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.