Pune : श्री कसबा गणपतीचे आशीर्वाद घेत मोहोळ यांच्या अभिवादन रॅलीला प्रारंभ

एमपीसी न्यूज – पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचं दर्शन घेत (Pune) आरती केली आणि आशीर्वाद घेतले. श्री कसबा गणपतीचे आशीर्वाद घेत पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अभिवादन रॅलीला प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह महायुतीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू, हा सार्थ विश्वास आहे.

Mulshi : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 36 लाखांची फसवणूक

पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने गेल्या दहा (Pune) वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे. याबरोबर शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी पुन्हा एकदा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

पुणे लोकसभेसाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह निवडणूक समितीचे मनःपूर्वक धन्यवाद मानत असल्याचे मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.