Pimpri : लहरायेगा तिरंगा देशभक्तीपर गीताच्या रील स्पर्धेमध्ये अमन मासीने प्रथम क्रमांक पटकावला

एमपीसी न्यूज – स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने लहरायेगा तिरंगा या देशभक्तीपर गीतावर रील स्पर्धेचे ( Pimpri ) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातील 150 कलाकारांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. उत्तर प्रदेश या राज्यातील अमन मासीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सामाजिक विषयावर लघुपट निर्मिती करून समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्या करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील रेडबड मोशन पिक्चर्स या संस्थेच्या वतीने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने लहरायेगा तिरंगा या शाळाबाह्य मुले, ऊसतोड कामगार, बाल मजदूर या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी लहरायेगा तिरंगा या गाण्याची निर्मिती नुकतीच करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या गाण्याची दखल घेत या गाण्याची निर्मिती करणारे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांना पत्र लिहून विशेष कौतुक देखील केलेले आहे.

Baramati News : मुहूर्त पाहून दरोडा टाकणा-या दरोडेखोरांचे शिर्डी, तिरुपतीमध्ये दानधर्म

या देशभक्तीपर लहरायेगा तिरंगा गीतावर रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातील 150 कलाकारांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील अमन मासी यांच्या ग्रुपने प्रथम पटकावत 11,111 रोख रकमेचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकावले आहे.

द्वितीय क्रमांक नवी दिल्ली येथील संजय मौर्या आणि टीम यांनी 7,777 रोख रक्कम व स्मृतिचिन्ह  पटकाविले आहे. तृतीय पारितोषिक पंजाब येथील अनाया खन्ना हिने 5,555 व स्मृतिचिन्ह पटकाविले आहे. सर्वात जास्त लाईक मिळवणाऱ्या नवी दिल्ली येथील आकाश व  इतर सह कलाकार यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

चिंचवड येथील पैस कला रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा करण्यात आली. तसेच या गाण्या मध्ये काम करणाऱ्या बालकलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सपंत गर्जे, डॉ नितीन लोंढे, प्रदीप पाटील, पांडुरंग देशमुख, सुनील कापसे, पल्लवी कापसे, दिग्दर्शक अरविंद भोसले, श्रेयश देशपांडे,  अभिनेत्री प्रज्ञा पाटील, अभिनेते रोहित पवार,  संतोष म्हात्रे, व्यंगचित्रकार गणेश भालेराव आदी  उपस्थित ( Pimpri ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.