Pimpri: शिलाई मशीन, सायकल योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज – शिलाई मशीन, मोफत सायकल योजना, चलन-वहन साहित्य योजनेसाठी अर्ज करणार्‍या 1100 लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. या लाभार्थ्यांना कागदपत्रांची पुर्तता करून नव्याने अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची म्हणजेच 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत नागरिकांनी कागदपत्रांची पुर्तता करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागर वस्ती विभागाअंतर्गत शहरातील दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनाअंतर्गत गरजू महिलांना शिलाई मशीन, विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल, अपंगानासाठी चलन-वहन साहित्याचे वाटप करण्यात येते.

शिलाई योजनेसाठी 750, सायकल योजनेसाठी 250 तर चलन-वहन साहित्यासाठी 100 अंपगांनी अर्ज केले होते. मात्र, त्यांचे अर्ज काही कारणास्तव अपात्र करण्यात आले आहेत. या अपात्र झालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पुर्तता करून नव्याने अर्ज करता यावेत, यासाठी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नागर वस्ती विभागातर्फे या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.