Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील फार्मसीच्या  विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांना औषधे भेट 

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम (Pimpri) महाराजांची पालखी दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रस्थान करते. या पालखीसोबतच लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. प्रवासादरम्यान अनेकदा वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात,हीच गरज लक्षात घेऊन आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या  विद्यार्थ्यांनी खंडोबा माळ, आकुर्डी येथे रविवारी (दि.11) विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करून औषधांचे वाटप केले.

Pune : सिंहगड किल्ल्यावर पीएमपीएमएल ई-बस सेवा पुन्हा सुरू करणार

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व  शिक्षकांनी पालखीचे दर्शन घेतले व त्याचबरोबर वारकऱ्यांना त्यांच्या पुढील सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी धीरज सुराणा, सुरेश क्षीरसागर, प्रतीक चुत्तर, युगल ओसवाल, योगेश शिरोडे, कृष्णा खेतन यांनी औषधे भेट देऊन विशेष सहकार्य केले.

यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, प्राध्यापक मुकेश मोहिते व इतर शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.  हरी भक्त सेवा या संघाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला व या उपक्रमात (Pimpri) ललित निमेकर याने विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.