Pimpri : कचरा विलगीकरण जनजागृतीसाठी तीन महिन्यांसाठी सव्वा पाच काेटींचा खर्च

एमपीसी न्यूज –  घरो घरचा ओला व सुका कचरा वेगवेगळा ( Pimpri ) गोळा करण्यासाठी जनजागृती करण्यारिता महापालिकेच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या संस्थांना पुन्हा मुदतवाढ दिली आहे. तीन महिन्यांसाठी पाच कोटी 37 लाख 84 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

Pimpri : ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर उलगडला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाईंचा संघर्ष प्रवास

मध्यप्रदेश मधील इंदूर शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक केली आहे. या संस्था नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत जनजागृती करतात, असा महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी इंदूर येथील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेचर्स लि. या संस्थेला अ, ड, इ आणि ह या चार क्षेत्रीय कार्यालयाचे काम देण्यात आले आहे.

डिवाईन मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेसला ब, क आणि ग या तीन क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील काम दिले आहे. तर, जनवानी संस्थांकडे फ क्षेत्रीय कार्यालयाचे काम आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून या तीन संस्थांना नोव्हेंबर 2021 पासून एका वर्षासाठी नेमण्यात आले होते. त्या बदल्यात या संस्थांना घरटी तसेच, प्रत्येक दुकानांमागे 24 रूपये 45 पैसे दरमहा दिले जातात.

या संस्थांची एका वर्षांची मुदत संपली. मात्र, आरोग्य विभागाने  निविदा प्रक्रिया राबविली नाही. तीन संस्थांना थेट एका वर्षांची मुदतवाढ दिली. त्यानंतरही महापालिकेने कोणतीही निविदा प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे या तीन संस्थांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी पाच कोटी 37 लाख 84 हजार 888 रूपये खर्च होणार ( Pimpri ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.