Pimpri : ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर उलगडला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाईंचा संघर्ष प्रवास

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांनी पाहिला चित्रपट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी (Pimpri) येथे समाजसुधारक, जेष्ठ विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट शालेय विद्यार्थाना दाखवण्यात आला.

Private Coaching Classes : केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात खाजगी क्लास संचालक आक्रमक

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने शहरातील 150 विद्यार्थ्यांना पिंपरीतील विशाल ई स्क्वेअर या चित्रपट गृहात या चित्रपटाचा शो दाखविण्यात आला. चित्रपट पाहून विद्यार्थीही भावनिक झाल्याचे दिसून येत होते.

या उपक्रमासंदर्भात बोलताना आयोजक चंद्रशेखर जाधव म्हणाले की, येणाऱ्या नवीन पिढीला पुरोगामी महाराष्ट्रच्या इतिहासाची माहिती व्हावी. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी अस्पृश्यता व जातीव्यवस्था निर्मुलनासाठी केलेल्या संघर्षाची माहिती मिळावी या उद्देशाने हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, प्रदेश सोशल मीडिया समनवयक वसीम शेख, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे मा. सरचिटणीस कुंदन कसबे, जिल्हा प्रवक्ते विशाल कसबे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, चिंचवड विधानसभा सरचिटणीस शैलेश अनंतराव, मनोज लष्करे, हृषीकेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित (Pimpri) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.