Private Coaching Classes : केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात खाजगी क्लास संचालक आक्रमक

एमपीसी न्यूज – खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर   ( Private Coaching Classes) अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने मागील आठवड्यात नवीन नियमावली जाहीर केली. केंद्र सरकारच्या या धोरणा विरोधात खाजगी क्लासेसच्या संचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारच्या काही तरतुदीन विरोधात न्यायालयीन लढा लढण्याची तयारी या संचालकांनी दाखवली आहे.

विविध प्रकारची आमिष दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा सपाटा सध्या खासगी क्लासेसकडून सुरू असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी प्रलोभने देऊन गुणवत्तेशी तडजोड केली जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे केंद्र सरकारने खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Ayodhya : रसाळ मुद्रा दे रे राम म्हणत पहा श्री रामाचे विलोभनीय रूप आणि अयोध्येतील भावचित्रे

केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे किमान दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. या नियमामुळे 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या क्लासेसचा प्रश्न उपस्थित होणार आहे. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गॅरंटी कोचिंग क्लासेसना देता येणार नाही.

नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खासगी कोचिंग क्लासेसची व्याख्या केली आहे. ज्या जागेत 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल. हल्ली कोणीही कोणत्याही परवानगी शिवाय खासगी कोचिंग क्लासेस सुरू करत आहे. यापुढे कुणालाही खासगी कोचिंग क्लासेस सुरू करता येणार नाहीत. खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालकांना विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही.

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने याबाबत मागील आठवड्यात अध्यादेश जारी केला. आगामी काळात खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची नाशिक येथे बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी या आंदोलनाबाबत माहिती दिली. खाजगी कोचिंग क्लासेसची कोणत्याही प्रकारची नोंद होत नसताना देखील केंद्र सरकारने मागील आठवड्यात काढलेल्या अध्यादेशात खाजगी कोचिंग क्लासेसची नोंदणी रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे कोचिंग क्लासेस संचालकांचा गोंधळ होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादे संदर्भातील अटीमुळे देखील केंद्राविरोधात संचालकांचा रोष निर्माण होत  ( Private Coaching Classes)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.