Pimpri : शून्य कचरा कार्यक्रमाविषयी जनजागृती करत साजरे करण्यात आले गौरी पूजन

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 ड क्षेत्रीय कार्यालय ( Pimpri) पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये शून्य कचरा कार्यक्रम झाल्यानंतर सौं. पद्मजा बांदल यांनी सेवानिवृत्त झाल्यावर स्वच्छता विषयक कामाची सुरुवात स्वतःच्या घरातून केली.

दरम्यान यावेळी गणशोत्सवात सजावट करताना कचरा, त्याचे वर्गीकरण, संबंधित फ्लेक्स,  शून्य कचरा करून त्याचा वापर आणि प्रक्रिया असे करून  शून्य कचरा कार्यक्रमाविषयी जनजागृती करत गौरी पूजनाचा कार्यक्रम त्यांनी साजरा केला.

PCMC : गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज

हा  उपक्रम त्यांच्या स्वतःच्या घरापूरता स्तिमित न राहता गणशोत्सवासाठी त्यांच्याकडे  येणाऱ्या किमान 80 ते 90 कुटूंबातील व्यक्तींनी समजून घेतला. यासाठी पद्मजा यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सहकार्य केले.

त्यांना भेट दिलेल्या कुटुंबांना हा उपक्रम राबविण्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच हा उपक्रम का राबवायचा हे समजवण्यात आले.
अशाप्रकारे पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरोघरी असा उपक्रम प्रत्येकाने राबवला तर आपले शहर नक्कीच पूर्ण देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल, असे सौ पद्मजा म्हणाल्या.

पिंपरी  महानगरपालकेचे ड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे व परिसरातील ( Pimpri) नागरिकांनी पद्मजा यांचे कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.