Pimpri : ‘त्या’ घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करा – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल दुर्घटनेत मृत्युमुखी ( Pimpri )पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत करावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाच्यावतीने करण्यात आली. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुख्यमंत्री, कामगार मंत्री व कामगार उपायुक्त अभय गीते यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

BJP : केंद्रात आणि राज्यात यापुढेही भाजपाचीच सत्ता – राहुल लोणीकर

पुणे जिल्ह्यात कामगारांच्या अपघाती मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे शासन व कामगार विभागाचे दुर्लक्ष होत असून, कोणतीही पूर्वदक्षता घेतली जात नाही.

मार्केटयार्ड येथील हॉटेलमधील आगीची दुर्घटना ही हॉटेल मालकाच्या चुकीमुळे घडलेली आहे. हॉटेल मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही या पत्रात नखाते यांनी ( Pimpri )केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.