Talegaon : रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्यपदी निलेश गराडे

एमपीसी न्यूज – प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथील (Talegaon) रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्य पदावर वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेचे निलेश संपतराव गराडे यांची नेमणूक करण्यात आली. याबाबतचे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांनी निलेश गराडे यांना दिले आहे.

मावळ तालुका आणि परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या आपत्ती जनक परिस्थितीमध्ये वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेच्या माध्यमातून निलेश गराडे हे सातत्याने मदत कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात. यामध्ये अपघातग्रस्तांची मदत करणे,

Pimpri : ‘त्या’ घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करा – काशिनाथ नखाते

पाण्यामध्ये बुडालेल्या नागरिकांना बाहेर काढणे, उंच डोंगर माथ्यावरून खाली पडलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, आगीच्या घटनांमध्ये सहकार्य करणे, वन्यजीवांचे रक्षण करणे, मानवी वस्तीत आढळलेल्या वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणे अशी कामे निलेश गराडे आणि त्यांची टीम सातत्याने करत असते.

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून रुग्णांचे हित जोपासण्याचे काम केले जाते. या समितीवर निलेश गराडे यांची स्वीकृत सदस्य पदावर नेमणूक (Talegaon) करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.