Mulshi : कंपनीच्या कॅशियरनेच केली चोरी; पैसे चोरून चोर पसार

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गल्ल्यातून (Mulshi) कॅशियरनेच पैसे चोरल्याची घटना गुरुवारी (दि.15) मुळशी येथे घडली आहे. याप्रकरणी श्रवण विवेक नाईक (वय 34, रा.मुळशी) यांनी फिर्याद दिली असून विश्वास अंकुशराव नाईक (रा. हिंगोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : ‘त्या’ घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करा – काशिनाथ नखाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीकडे कॅशियर म्हणून काम करतो. त्याने त्याच्या कंपनीच्या आयडी कार्डचा वापर करत कंपनीत प्रवेश केला. त्याने गल्ल्याचे (Mulshi) लॉक तोडून त्यात ठेवलेले 22 हजार रुपये काढून घेतले. हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.