Pimpri : फुगेवाडीतून बेकायदा मद्यसाठा जप्त; एकजण ताब्यात

एमपीसी न्यूज – बेकायदा मद्यविक्री होत असणाऱ्या पत्राशेडवर धाड टाकत भोसरी पोलिसांनी १३ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. सोमवारी (दि.८) दुपारी दोनच्या सुमारास फुगेवाडी संजयनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

योगेश बापू आयाळी (वय २१, रा. संजयनगर, फुगेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समीर लक्ष्मण रासकर (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना फुगेवाडी संजयनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता आयाळी हा बेकायदा दारू विक्री करत असल्याचे दिसले.

पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या १३ हजार २४० रुपयांच्या व्हिस्की आणि बिअरच्या बाटल्या मिळाल्या. याप्रकरणी आयाळी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.