Maval: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार बारणे उद्या भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे मंगळवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याअगोदर महायुतीचे कार्यकर्ते आकुर्डीतील म्हाळसाकांत चौक ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढणार आहेत.

  • बारणे यांचा अर्ज दाखल करताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई , पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार तथा पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष सुधाकर वारभवन उपस्थित राहणार आहेत.

प्राप्त अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार आहे. तर, 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराला रंगत येईल. मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.