Pimpri : भाडे मागितले म्हणून घरमालकाला भाडेकरूकडून मारहाण

एमपीसी न्यूज – थकलेले भाडे मागितले म्हणून घरमालकाला (Pimpri) घरात घुसून मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी पिंपरीतील मिलींदनगर येथे घडली आहे.

 याप्रकऱणी महिलेने फिर्याद दिली असून  कैलास बिरुमल लाडी (वय 35 रा.पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 Pune : आयसर संस्थेला केंद्र सरकार आवश्यक सर्व सहकार्य करणार – डॉ. सुभास सरकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा चुलत भाऊ असून तो फिर्यादीच्या घरात भाड्याने राहतो.त्याने डिसेंबर 2022 पासून भाडे दिलेले नाही. यावेळी पैसे मागितलेअसता आरोपीने पैसे नही दुंगा, जो करना है करलो, मै क्या करता हूं दिखाता हूं म्हणत फिर्यादीला हाताने मारहाण करत धमकी दिली व फिर्यादीची बहिण व मुलीला शिवीगाळ केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा (Pimpri) दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.