IPL 2023 – मुंबई इंडियन्स चा कोलकाता वर दमदार विजय; अर्जुन तेंडुलकर याचे आयपीएल मध्ये पदार्पण

एमपीसी न्यूज – 16 एप्रिल 2023, रविवारी दुपारच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स (IPL 2023) ने कोलकाता नाईट रायडर्स ला 5 बळी आणि 14 चेंडू राखून निवांतपणे हरवले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यामध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्यांना बरेच प्रेक्षक ‘ गॉड ऑफ क्रिकेट ‘ म्हणून ओळखतात त्यांचा सुपुत्राने आयपीएल मध्ये स्वतःचे पदार्पण केले. मुंबई इंडियन्स ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी चा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना कोलकाताचे दोन्ही सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज (8 धावा) आणि नारायण जगदीशन (0 धावा) स्वस्तात बाद झाले. तिसऱ्या क्रमंकावर आलेल्या व्यंकटेश अय्यर ने उत्कृष्ट फलंदाजी करत 51 चेंडुमध्ये 104 धावा काढल्या. परंतु अय्यर प्रमाणे कोलकाताचे बाकी फलंदाज चालले नाहीत. कर्णधार नितीश राणा ( 5 धावा), शार्दुल ठाकूर ( 13 धावा), रिंकू सिंग (18 धावा), आंद्रे रसेल (21 धावा) यांचा योगदानामुळे कोलकाता 185 या सन्मानजनक धावसंख्ये पर्यंत पोहोचले. अर्जुन तेंडुलकरने मुंबईच्या गोलंदाजीची सुरुवात केली. 2 षटकांमध्ये त्याला एकही बळी मिळाला नाही. मुंबईकडून रितिक शौकीन यांनी दोन बळी घेतले तर कॅमेरून ग्रीन, डुआन जॅन्सन, रिले मेरेडिथ आणि पियूष चावला यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Pimpri : भाडे मागितले म्हणून घरमालकाला भाडेकरूकडून मारहाण

इतरवेळी कर्णधार असणारा रोहित शर्मा हा या सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला. दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (20 धावा)आणि ईशान किशन (51 धावा ) लक्ष चा पाठलाग करताना भक्कम पाया रचला. खराब फॉर्म मधून चाललेल्या सूर्यकुमार यादव याने ही चांगली कामगिरी करत 25 चेंडमध्ये 43 धावा काढल्या. टीम डेव्हिड (24 धावा) आणि तिलक वर्मा (30 धावा) यांचा परिमुळे मुंबईने आरामात विजय मिळवला. कोलकाता कडून गोलंदाजी करताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या सुयश शर्माने दोन बळी घेतले तर शार्दुल ठाकूर, वरून चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

अर्जुन तेंडुलकरचे आयपीएल मध्ये पदार्पण झाल्यामुळे प्रेक्षकांचे त्याच्याकडून फारच अपेक्षा आहेत. अर्जुन तेंडुलकर स्वतःचे वडील सचिन तेंडुलकर यांचा वारसा पुढे कसा चालवेल हे बघावे लागेल. अर्जुन तेंडुलकर याची गोलंदाजीची क्रिया (IPL 2023) ही चांगली दिसत आहे व तो पुढे भारतीय टीम साठी खेळ याची अपेक्षा आपण लावू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.