Pimple Gurav :  शास्त्रीय आणि कलात्मक संगमाचा जीवन संगीत कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व  दिवंगत लौकिकभाऊ माटे यांच्या स्मरणार्थ माटे अँड सन्स सोशल फाउंडेशन व सांगवी पोलीस स्टेशन (Pimple Gurav) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगृहात डॉ. संतोष बोराडे प्रस्तुत तसेच आनंद, आरोग्य आणि अध्यात्माचा सुरेल शास्त्रीय आणि कलात्मक संगम असलेला “जीवन संगीत” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक विजय लांडे, शासकीय अधिकारी महेश माटे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अध्यक्ष डॉ. पी. एल. खंडागळे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे,  सखाराम रेडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे,  माटे अँड सन्स सोशल फौंडेशनचे संचालक ओंकार माटे, मनीष पंडित आदी उपस्थित होते.

IPL 2023 – मुंबई इंडियन्स चा कोलकाता वर दमदार विजय; अर्जुन तेंडुलकर याचे आयपीएल मध्ये पदार्पण

सांगवी, पिंपळे गुरव येथील माटे अँड सन्स सोशल फौंडेशनचे संचालक ओंकार माटे गेली अनके वर्ष सातत्याने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. (Pimple Gurav) रक्तदान शिबीर, गरजू व गोरगरीबांसाठी सतत मदतीचा हात देत असतात. कोरोनाच्या काळात पाच हजाराहून अधिक पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, नागरिक आदींना मास्क व अत्यावश्यक किट वाटप करण्यात आले. माटे अँड सन्स सोशल फाउंडेशन पुढील वाटचालीत असेच विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.