Pimpri : फळांचा राजा आंबा मार्केटमध्ये दाखल 

एमपीसी न्यूज – फळांचा राजा आंबा पिंपरी-चिंचवड शहरातील मार्केटमध्ये दाखल झाला आहे. यंदाच्या मोसमातील पहिला हापूस जातीचा आंबा पिंपरी कॅम्पातील मार्केटमध्ये दाखल झाला आहे.  याशिवाय बदाम आणि लालबाग या जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. हा आंबा चाखण्यासाठी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

हापूस आंब्याला सातशे ते 1200 रुपये प्रतिडझन भाव मिळाला आहे. तर, 400 रुपये किलो या दराने विक्री केला जात आहे. बदामी 80 ते 120 रुपये किलो आणि लालबाग 70 ते 120 रुपये किलो या दराने विक्री केला जात आहे.

आंबा मार्केटमध्ये आला आहे. महाग असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. परंतु, आंब्याची चव चाखणारे आंबा घेतात. पाडव्यानंतर आणखीन भाव वाढण्याची शक्यता आहे, असे विक्रेते कुमार शिरसाट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.