Pimpri : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनसेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णसेवा ( Pimpri ) देणा-या स्टाफ नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचा-यांना दिवाळी बोनस दिला नाही. या सर्व कर्मचा-यांची पिळवणूक करणा-या ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात मनसे पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

Chinchwad : पिण्याच्या पाण्याचे बोअर पाडण्यावरून दोन कुटुंबात मारहाण , परस्पर विरोधी तक्रार दाखल

मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश पटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलकांनी डोक्याला काळ्या रंगाच्या रेबीन बांधून काम करत ठेकेदार आणि पालिका प्रशासनाचा निषेध केला.

दैनंदीन कामावर त्याचा कसलाही परिणाम पडू दिला नाही. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, सांगवी आणि यमुनानगर रुग्णालयात सोमवारी दिवसभर हे आंदोलन करण्यात आले. तिन्ही रुग्णालयातील शेकडो कामगार, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेचे राजू सावळे, सीमा बेलापूरकर,अलेक्स आप्पा मोझेस,आशिष शेलार,बाळू शिवशरण, सागर शिंदे आदींनी आंदोलनासाठी पुढाकार ( Pimpri ) घेतला.

 

दैनंदीन कामावर त्याचा कसलाही परिणाम पडू दिला नाही. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, सांगवी आणि यमुनानगर रुग्णालयात सोमवारी दिवसभर हे आंदोलन करण्यात आले.

तिन्ही रुग्णालयातील शेकडो कामगार, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेचे राजू सावळे, सीमा बेलापूरकर,अलेक्स आप्पा मोझेस,आशिष शेलार,बाळू शिवशरण, सागर शिंदे आदींनी आंदोलनासाठी पुढाकार (Pimpri) घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.