Chinchwad : पिण्याच्या पाण्याचे बोअर पाडण्यावरून दोन कुटुंबात मारहाण , परस्पर विरोधी तक्रार दाखल

एमपीसी न्यूज – पिण्याच्या पाण्याचे बोअर पाडण्यावरुन दोन कुटुंबात मारहाण ( Chinchwad ) झाली आहे. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाल्हेकरवाडी येथे रविवारी (दि.10) घडली आहे.

पहिल्या फिर्यादी मध्ये घराची भिंत पाडून बोअर घेत असल्याने दत्ता लक्ष्मण तुपे यांनी त्याना अडवले असता आकाश भिमसेन तुपे, शंकर जगन्नाथ तुपे, संतोष जगन्नाथ तुपे व चार महिला यांनी वाद घालत जाब का विचारला म्हणून दत्ता व त्यांच्या मुलीला व मुलाला मारहाण करत जखमी केले.

Moshi : भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनाला मोशीमध्ये उद्यापासून प्रारंभ

तर दुसऱ्या फिर्यादीत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दत्ता लक्ष्मण तुपे (वय 40), महादेव दत्ता तुपे, गणेश तुपे, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात म्हटले आहे की, फिर्यादी महिला त्यांच्या जागेत पिण्याच्या पाण्यासाठी बोअर घेत होत्या. त्यावेळी आरोपी नातेवाईक तिथे आले. त्यांनी बोअर घेण्यास फिर्यादी महिलेला विरोध केला.

त्यावरून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच महादेव तुपे याने फिर्यादीच्या मुलीला दगडाने मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत ( Chinchwad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.