Moshi : भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनाला मोशीमध्ये उद्यापासून प्रारंभ

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’चे मोशी येथे (Moshi) आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन  13 ते 17 डिसेंबर दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे.  

15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 450 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, 5 दिवसांमध्ये देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Dapodi : अल्फा लावल संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त 419 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

किसान प्रदर्शनासाठी शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे (Moshi) सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत.

या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील. प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी स्पार्क या दालनाचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नाव कल्पनांना चालना देण्यात येईल.

पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. 18 राज्यातील शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या 1,00,000 ओलांडण्याचा अंदाज आहे.

किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : www.kisan.in

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.