Dapodi : अल्फा लावल संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त 419 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – अल्फा लावल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Dapodi) येथील अल्फा लावल कर्मचारी कामगार संघटनेच्या 14 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने व्यवस्थापनाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 419 रक्तदात्यांनी उत्साहात सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने कामगार, कर्मचारी, ट्रेनी, मॅनेजर व सर्व कंत्राटी कामगार यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उभा केला आहे.

अल्फा लावल कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात आणि प्रत्येक कार्यक्रमात कामगार, कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि सहभाग कायम असतो. कामगारांच्या खिलाडूवृत्तीला वाव देत आगामी काळात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती युनियन अध्यक्ष किरण देशमुख यांनी दिली.

Police Training Center : राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींची क्षमता वाढणार

तसेच या वेळी ज्येष्ठ कामगार राजेंद्र बेडसे यांच्या हस्ते कामगार संघटनेच्या (Dapodi) नाम फलकाचे पूजन करून अनावरण करण्यात आले.

युनियन अध्यक्ष किरण देशमुख, उपाध्यक्ष रवींद्र धाडवे, विजय गायकवाड, जनरल सेक्रेटरी सारंग शिंदे, सेक्रेटरी तानाजी बोरे, खजिनदार समीर इंदलकर, सदस्य अधिक जगताप, अजय पाटील, मंगेश लिपारे, सोमनाथ नामधारे, सचिन हुपरे यांनी वर्धापन दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.