Pune : फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने काढा; प्रवीण चोरबेले यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मार्केटयार्ड येथे मागील अनेक दिवसांपासून (Pune) फुटपाथवर पार्किंग व विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. हे अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे महापालिकेने दिनांक 11 डिसेंबर रोजी सर्व फुटपाथ मोकळे करून दिले. पादचारी दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. मात्र, मार्केटयार्ड येथील फुटपाथ आठ दिवसांत मोकळा करण्यात यावा, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Moshi : भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनाला मोशीमध्ये उद्यापासून प्रारंभ

आतातरी या फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, असे प्रवीण चोरबेले यांनी म्हटले आहे.

दिनांक 11 डिसेंबर रोजी पुणे महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्ता केवळ (Pune) चालण्यासाठी ठेवण्यात आला होता. विविध प्रकारची सजावट करून हा रस्ता पादचाऱ्यांना केवळ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.