Pimpri News : शहरात 1 जुलैपासून 450 ठिकाणी होणार ‘पे अँड पार्क’

13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचाही समावेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 जुलै 2021 पासून पिंपरी- चिंचवड शहरात पे अँड पार्क योजना लागू करण्यात येत आहे. यात 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकूण 450 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत.

महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करणेबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त व संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत 1 जुलैपासून शहरात पे अँड पार्क योजनेची सुरवात करण्याचे निश्चित केले आहे.

त्यामध्ये 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सर्व पार्किंग ठिकाणांची माहिती सर्व नागरिकांना व वाहन चालकांना होण्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. याठिकाणी शहरामध्ये पे अँड पार्क योजना 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात येत आहे. त्यास लागून असलेलया नो पार्किंगच्या ठिकाणांच्या यादीची प्रसिध्दी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय (वाहतुक विभाग) प्रसिध्द करणार आहे.

ही आहेत पार्किंग ठिकाणे !

रस्त्यांवरील (ऑन स्ट्रीट पार्किंग) नावे :

टेल्को रोड -56, स्पाईन रोड- 55, नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्ता- 41, जुना मुंबई पुणे रस्ता – 58, एम. डी.आर. 31- 39, काळेवाडी फाटा ते देहू – आळंदी रस्ता – 36, औंध रावेत रस्ता- 16, निगडी वाल्हेकरवाडी रस्ता -29, टिळक चौक ते बिग इंडीया चौक – 8, प्रसुनधाम सोसायटी रोड- 11, थेरगाव गावठाण रोड- 12, नाशिक फाटा ते मोशी रोड – 24 आणि वाल्हेकरवाडी रोड- 15

उड्डाणपुलाखालील जागा/ ऑफ स्ट्रीट पार्किंग

राँयल ग्लोरी सोसायटी वाकड, रहाटणी स्पॉट – 18 मॉल, अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह- भोसरी, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड, भक्ती शक्ती फ्लाय ओव्हर- निगडी, एम्पायर ईस्टेट फ्लाय ओव्हर- चिंचवड, चापेकर चौक ब्लॉक – 1 चिंचवड, चापेकर चौक ब्लॉक – 2 चिंचवड, पिंपळे सौदागर वाहनतळ आणि मधुकर पवळे उड्डाणपूल – निगडी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.