Pimpri : पिंपरी-चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांची ग्रंथ तुला

तुला करण्यात आलेल्या ग्रंथांचे उपस्थितांमध्ये वितरण

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांच्या पुढाकाराने ‘जिना इसी का नाम है’ या सदाबहार हिंदी मराठी संगीत (Pimpri) रजनीचे गदिमा नाट्यगृहात आयोजन केले होते. यावेळी त्यांची ग्रंथ तुला करण्यात आली.  तुला करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या गाथा उपस्थितांमध्ये वितरीत करण्यात आल्या.

PCMC : महाविकास आघाडीची आयारामांवर भिस्त?

यावेळी  अनिता धनंजय भिसे यांच्या काव्यसंग्रहाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकाशनासाठी ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे देखिल उपस्थित होते.

पृथ्वीराज थिएटर्स आणि स्वरा म्युझिकल प्रस्तुत ‘जिना इसी का नाम है’ या कार्यक्रमाचे सूत्रधार माजी शहर अभियंता आणि सुप्रसिद्ध गायक  सतिश इंगळे आणि अ‍ॅड.शोभा कदम यांनी अनेक सदाबहार गीतांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. गायक संजय खटावकर,वैजु चांडवले,मौतुषी दास,प्रज्ञा गौरकर,नंदकुमार कातळे आणि पृथ्वीराज यांनी प्रेक्षकांच्या पसंतीच्या गीतांचे सादरीकरण केले.

पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे सचिव सुनील थोरात,  दिनेश काटे,शिल्पा दरेकर, अजिंक्य भिसे आणि निलांबरी भिसे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जोगळेकर (Pimpri) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.