PCMC : महाविकास आघाडीची आयारामांवर भिस्त?

एमपीसी न्यूज – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर महाविकास (PCMC) आघाडीने आगामी महापालिका निवडणुका एकत्रित लढविण्याचे जाहीर केले आहे. पण, काँग्रेस- शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तीन पक्षांकडे निवडून येण्याची क्षमता असणा-या उमेदवारांची वानवा आहे. कोणी उमेदवार देता का उमेदवार असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर असून त्यांची सर्व मदार आयारामांवरच दिसते.  

Pune : रविवारपर्यंत पावसाचा जोर राहणार कायम, पुणे व पालघरला रेड अलर्ट

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नगरसेवकसंख्या 128 आहे. भाजप-अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेही उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तीनही पक्षांकडे उमेदवारांची कमतरता दिसते.

काँग्रेसने मागीलवेळी 67 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला नव्हता. राज्यातील सत्ता गेल्यापासून शहर काँग्रेसमध्ये मरगळ दिसत असून काँग्रेसला सक्षम उमेदवार शोधावे लागणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहेत.

शहरातील एकाही पदाधिका-याने अद्यापर्यंत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे पवार यांनी युवकांसह नऊ जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे. कार्यकारी समितीवरच शरद पवार यांचे पक्षाची भिस्त असणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात आहेत. राहुल कलाटे समर्थकांसह जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे यांचीही शहरातील ताकद कमी झाली आहे.  कट्टर शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबतच आहेत.

पण, शिवसेनेलाही निवडून येणा-या उमेदवारांची शोधमोहिम करावी लागणार आहे. ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी देखील आहे. महायुतीतील तीन पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त असून सर्वांना उमेदवारी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे  महायुतीकडील नाराजांवरच महाविकास आघाडीची भिस्त राहील असे चित्र सद्यस्थितीत दिसत (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.