Pune : रविवारपर्यंत पावसाचा जोर राहणार कायम, पुणे व पालघरला रेड अलर्ट

एमपीसी न्यूज – संपूर्ण राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून तुफान पाऊस (Pune) कोसळत आहे. हवामान खात्याने हा पावसाचा जोर उद्या म्हणजे रविवार पर्यंत कायम राहणार असून पुणे व पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घाट परिसर व डोंगराळ भागात जाणे टाळावे असे आव्हान देखील केले आहे.

तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिमला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 Pune : शरद पवार यांचे विश्वासू सहकारी विठ्ठल शेठ मनियार यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाला लावली हजेरी

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, ‘‘उत्तर भारतात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दक्षिण छत्तीसगडमध्येही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून रविवार, 23 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.’’

सोमवार, 24 पासून 27 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहील. तुरळक ठिकाणी पाऊस होईल. 26 जुलैच्या दरम्यान ओडिशा किनारपट्टीवर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे झुकल्यास जुलै महिन्यातील शेवटचे चार दिवस आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही दिवसांत राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

उलट बाजूला शनिवारी पुण्यातला पावसाचा जोर ओसरला आहे

हवामान खात्याने पुण्यात जरी रेड अलर्ट दिला असला तरी शुक्रवारी पुणे व आसपासच्या परिसरात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पहायला मिळाले. पुणे परिसरात सरासरी केवळ 2 ते 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज कितपत बरोबर ठरेल हे दोन दिवसात कळेल. तुर्तास नागरिकांनी परिस्थितीनुसार योग्य ती काळजी घेणे (Pune) गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.