Pimpri : जांभवडे गावात 500 देशी वृक्षांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स अंतर्गत विभागातील झेनॉन फॅक्टरी आणि पेंट शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा ( Pimpri) डोंगराच्या मागील बाजूस जांभवडे  या गावांमध्ये वनीकरणाची जागा आहे त्या ठिकाणी नुकतेच 500 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. पिंपळ,वड,आंबा,चिंच,लिंब, उंबर यासारखी  25 प्रकारची देशी वृक्ष लावण्यात आली.

याप्रसंगी टाटा मोटर्सचे प्लांट हेड तिवारी,पेंट शॉप फॅक्टरी हेड  नितीन काशीद,  झेनॉन फॅक्टरी हेड व्ही.के. सिंग व  जीवन देशपांडे त्याचप्रमाणे  युनियनचे कार्याध्यक्ष  अशोक माने आणि  आणि युनियनचे  प्रतिनिधी तसेच पेंट शॉप व झेनॉन शॉप चे सर्व कामगार बंधू सहकुटुंब उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये तेथील स्थानिक सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.

दरवर्षी जुलै महिन्यामध्ये  एक लक्ष… देशी वृक्ष हे उद्दिष्ट मनात ठेवून  वृक्षारोपण केले जाते.गेली तीन वर्ष हा उपक्रम चालू आहे.

आत्तापर्यंत सहा हजार वृक्ष लावण्यात आलेली आहे.  त्याचे तीन वर्षे संवर्धन सुद्धा करण्यात आले आहे

 ह्या वर्षी देखील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून एक दिवस निसर्गासाठी म्हणून भंडारा डोंगरच्या मागील बाजूस आनंदाने वृक्षारोपण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम भाऊ ताठे यांनी केले तर आभार  प्रशांत वायकोस यांनी मानले.

हा कार्यक्रम  जे ब्लॉक पॅन्ट शॉप येथील सर्व सहकारी मित्र ऑफिस स्टॉप युनियन प्रतिनिधी व टाटा मोटर्स कर्मचारी पतसंस्था यातील सदस्यामुळे तसेच  वृक्ष मित्र  जगन्नाथ जरग आणि  सर्व कामगार यांच्यामुळे यशस्वी ( Pimpri)  झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.