Pune : संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांचा पाणीसाठा 34 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चारही (Pune) धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 1.04 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे चारही धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Pimpri : जांभवडे गावात 500 देशी वृक्षांचे वृक्षारोपण

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून सध्या 10.09 टीएमसी म्हणजे च 34.61 टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

 सोमवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांत मिळून 9.05 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत 10.09 टीएमसी पाणीसाठा जमा झाला.

गेल्या 24 तासांत 1.04 टीएमसी पाणी धरणांमध्ये जमा झाले आहे.

Maval News : विनम्र स्वभावाच्या रामदास काकडे यांच्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य. – पै.चंद्रकांत सातकर

शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यामुळे शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा गेल्या 24 तासांत जमा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मंगळवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात 30 मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे 20 मि.मी. आणि 16 मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला.

चार धरणांतील पाणीसाठा

टेमघर – 0.7 टीएमसी  – 21.18 %

वरसगाव – 4.51 टीएमसी – 35.18%

पानशेत – 3.89 टीएमसी 36.55%

खडकवासला – 0.90 टीएमसी 45.72%

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.