Dighi : दिघी येथे धमकी देत दुकानावर ताबा घेण्याचा प्रयत्न, चार जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – दुकानाला कुलूप लावून कामावर जात असलेल्या तरुणाला आणि त्याच्या भावाला धमकी (Dighi ) दिली. तसेच दुकानावर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी 11 वाजताच्या सुमारास गणेश नगर दिघी येथे घडली.

Pune : संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांचा पाणीसाठा 34 टक्क्यांवर

दिनकर बाबुराव सारगे (वय 42, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शुभम ज्योतीप्रसाद साह, एक महिला आणि दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गणेश नगर दिघी येथे मृणाल फॅब्रिकेशन नावाचे दुकान आहे.

दुकानाला कुलूप लावून फिर्यादी कामावर जात असताना त्यांच्या भावाने फोन केला.

शुभम साह याने आपल्याला धमकी दिली असून तो आपल्या दुकानाला कुलूप लावणार आहे, असे भावाने कळविले.

त्यामुळे फिर्यादी तात्काळ दुकानाकडे गेले असता आरोपी त्यांच्या दुकानाला कुलूप लावत होते.

फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला असता आरोपींनी फिर्यादी यांना देखील धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत (Dighi ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.