Dighi: घरफोडीमधील सराईत आरोपींना अटक,घरफोडीच्या दोन गुन्हातील मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – दिघी परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईताना दिघी पोलिसांनी (Dighi)बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन घरफोडीतल मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
अतुल चंद्रकांत अमले (वय 28 रा.  वारजे माळवाडी),रोहित दिपक सातपुते (वय 28 रा.  हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दिघी परिसरात घरफोडी करत होते त्याचा तपास  (Dighi)घेण्यासाठी पथकाने तांत्रीक विश्लेषण व सी.सी.टि.व्हि. फुटेज च्या आधारे तसेच गोपनीय माहितीनुसार व्यवस्थित चौकशी करून एक आरोपी अतुल अमले हा पुणे शहर मधील पोलीस  रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी  त्याचा पत्ता तसेच मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत तपास  करून आरोपी अतुल चंद्रकांत अमले, याला पिरगुंट घाट, मुठारोड येथून ताब्यात घेतले.
त्याचेकडून दुसरे आरोपी रोहित  सातपुते असे दोघांना  शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेवून आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेले दाग-दागिने जप्त करून घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत.
तसेच नमुद गुन्हयातील दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत असून त्यातील आरोपी अतुल आमले याचेवर विविध पोलीस ठाणेस वेगवेगळ्या प्रकारचे 32 गुन्हे दाखल आहेत.तर आरोपी रोहित सातपुते याचेवर विविध पोलीस ठाणेस वेगवेगळ्या प्रकारचे 16 गुन्हे दाखल आहेत.
दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ,  सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे व पोलीस हवालदार 801 पोटे, पोलीस हवालदार 1020 कांबळे, पोलीस हवालदार 1168 जाधव, पोलीस हवालदार. 1572 जाधव, पोलीस अंमलदार 2828 काकडे, पोलीस अगंलदार 2094 जाधव, मपोशि 3700 बच्छाव यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.