Pimpri : कालिदासाच्या महाकाव्याचे जतन व्हावे – प्रा. तुकाराम पाटील

एमपीसी न्यूज- रामटेक, नागपूर येथील महाकवी कालिदास स्मारकाला पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भेट दिली. वसंत पंचमी व सरस्वती पूजनाचे अौचित्य साधून हा कार्यक्रम साजरा झाला.

प्रा.तुकाराम पाटील म्हणाले-कालिदास हे महाकवी आहेत त्यांच्या प्रत्येक महाकाव्याचे वाचन कवींनी करणे आवश्यक आहे. “सत्त्तेच्या बंगल्याच्या पायदंडीवर, निर्लेप मनाचा माणूस बनून,जतन करतोय वारसा परंपरेचा “ही कविता सादर केली.

ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव म्हणाले, “संपूर्ण विश्वाने कालिदासांना कवी कुलगुरू म्हणून मान्यता दिली आहे.त्यांच्या दिव्यदृष्टीतून मेघाला पुरवलेले प्रादेशिक वर्णन, लोकसंस्कृती, निसर्गाविषयी सांगितलेली माहिती अद्वितीय आहे. कवी सुरेश कंक, माधुरी ओक यांनी बहारदार कविता सादर केल्या.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन उज्ज्वला केळकर यांनी केले. मीरा कंक, अनिकेत गुहे, रजनी अहेरराव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रामटेक येथील सुरक्षारक्षक नंदकिशोर अवथारे यांनी महाकवी कालिदास स्मारकाची माहिती दिली. अश्विनी कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.