Pimpri : सामाजिक न्याय पर्व अंतर्गत कार्यशाळेत कायद्यांविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज –  सहायक आयुक्त,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (Pimpri) विभाग  तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) यांच्या वतीने आयोजित ‘ सामाजिक न्याय पर्व ‘ उपक्रमाअंतर्गत जनजागृती व्याख्यानास आणि कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला.  सतीश कांबळे यांच्यासहित अनेक कायदे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन विषयक कायदा ,जेष्ठ नागरिकांविषयक कायद्यांवर या उपक्रमात चर्चा करण्यात आली.

Pune : संगीतकार अविनाश- विश्वजीत यांचा ज्येष्ठ निर्माते प्रशांत घैसास यांच्या हस्ते सत्कार

 सतीश कांबळे म्हणाले,’ अॅट्रोसिटी आणि जेष्ठ नागरिकांविषयक कायद्यांबद्दल जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी या क्षेत्रात कार्यरत संस्था ,व्यक्तीनी पुढाकार घेतला पाहिजे ‘.सहायक पोलीस आयुक्त गजानन टोणपे,समाजकल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर,पोलीस अधिकारी  तावरे,यशवंत गवारी,रेखा आनंद हे उपस्थित होते.सरकारी अभियोक्ता पाटील,प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर यांनीही मार्गदर्शन केले. पोलीस कर्मचारी,ज्येष्ठ नागरिक,सफाई कमर्चारी,पुणे जिल्हा समता दूत कार्यशाळेत  (Pimpri) सहभागी झाले.हा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन  येथे  संपन्न झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.