Pimpri : 89 व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय.  विद्यापीठ वतीने आयोजित (Pimpri) डॉ. पी. डी. पाटील (स्वागताध्यक्ष 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-पिंपरी-चिंचवड 2016 आणि 18 वे जागतिक मराठी संमेलन 2023) यांच्या संकल्पनेतून 89 व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित तसेच जागतिक मराठी संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवारी (दि.15)  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकार  दामोदर मावजो (गोवा) यांच्या हस्ते झाले.

Pune : फ्रीझर असलेल्या शवपेटीचे लोकार्पण; पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होते. तर  अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे होते.

जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व माजी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, विद्यापीठाच्या विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रंथांचे प्रकाशनासह ई-बुक तसेच संमेलनांचे यू-ट्यूब चैनल्सचे लोकार्पण करण्यात (Pimpri) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.